By : Vijay Rawoot
आपल्या देशामधे सर्वात दुर्दैवाची गोष्ट कुठली झाली असेल तर महापुरुषांना जात, भाषा, प्रांत यामधे बाांधुन ठेवले गेले. शिवाजी महाराज मराठ्यांचे व मुस्लिम विरोधी, महाराज म्हणजे रोहिडेश्वरची शपथ, शाहिस्तेखानाची बोटे, अफझलखानाचा कोथळा, पावनखिंड अशा गोष्टी बालपणी ऐकल्या की महाराजांचा इतिहास संपला असा समज होत असावा. तरीपण सी.बी.एस्.ई. च्या मानाने महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे चौथीचे पुस्तक महाराजांचा इतिहास चांगल्या प्रमाणात वर्षानुवर्षे मुलांना शिकवत आहे. इतर राज्यात राहणा-या मुलांना तर महाराज फक्त सिरीयल मधेच बघायला मिळत असतील.
आपल्या देशामधे सर्वात दुर्दैवाची गोष्ट कुठली झाली असेल तर महापुरुषांना जात, भाषा, प्रांत यामधे बाांधुन ठेवले गेले. शिवाजी महाराज मराठ्यांचे व मुस्लिम विरोधी, महाराज म्हणजे रोहिडेश्वरची शपथ, शाहिस्तेखानाची बोटे, अफझलखानाचा कोथळा, पावनखिंड अशा गोष्टी बालपणी ऐकल्या की महाराजांचा इतिहास संपला असा समज होत असावा. तरीपण सी.बी.एस्.ई. च्या मानाने महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे चौथीचे पुस्तक महाराजांचा इतिहास चांगल्या प्रमाणात वर्षानुवर्षे मुलांना शिकवत आहे. इतर राज्यात राहणा-या मुलांना तर महाराज फक्त सिरीयल मधेच बघायला मिळत असतील.
कोणत्याही महापुरुषाचा इतिहास शाळा महाविद्यालयात पंधरा वर्षे शिकवला जाऊ शकत नाही. शाळेत इतर पाच विषय असतात व महाविद्यालयात स्पेशलायझेशन् असते या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन या शाखा तर सोडाच पण कला शाखेत फक्त इतिहास व त्यात फक्त महाराजांचाच इतिहास शिकवला तर जगभरात हजारो वर्षे घडलेला इतिहास विद्यार्थी कधीच शिकू शकणार नाहीत.
आपला देश म्हणजे उत्सवप्रिय देश आहे. सानिया मिर्झाचा काळ होता तेंव्हा टेनिस रॅकेटस् चा खप वाढलेला. विश्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाला आणि चेस बोर्डस् ची विक्री प्रचंड वाढली. आता Uri - द सर्जिकल स्ट्राईक चित्रपट बघुन पालक मुलांना आर्मी मधे कधी जातोस विचारत असतील. शिवजयंती म्हणजे पण एक उत्सवापुरता मर्यादित दिवस ठरला आहे. राजकारण्यांचे शक्तिप्रदर्शन व एक दिवस सायलेंसर काढुन 'चायना मेड' कापडाचे भगवे झेंडे नाचवायचे म्हणजे मर्दुमकी असे काहितरी वातावरण होतयं.
सोशल मिडीया म्हणजे त्यावर सगळेच लेखक, कवी, इतिहासकार व संगीतकार. प्रत्येकजण स्वयंभू. त्यात पण प्रत्येकाचा स्वत:चा काहितरी अजेंडा असतो. पण काही असले तरी महाराजांना सर्वप्रथम 'हिंदवी स्वराज्य संस्थापक' या बेडीतुन मुक्त करुन रयतेचा राज्य निर्माता या त्यांच्या पुरोगामी व्यक्तिमत्वाला मुलांसमोर आणत राहिले पाहिजे. इंटरनेटवर वर महाराजांचे फोटो, इतके भडक करुन दाखवले जातात की त्यातुन ना इतिहास समजतो ना कलात्मकता दिसते. अनेकदा खोटा इतिहासच पुढे फॉरवर्ड केला जातो.
व्याख्याने इतिहासावरील वा अध्यात्मिक असतील तर साठी गाठलेली आणि जी इतिहास घडवू शकणार नाहीत, घरच्यांना अडचण नको म्हणुन बाहेर असतात अशी मंडळीच सभागृहात दिसतील. ज्यांनी देशाचे भविष्य घडवायचे आहे ते युवक फार कमी दिसतील. जाणता राजा व शिवगर्जना सारखी महानाट्ये याकामी चांगली भुमिका वठवत आहेत.
आज शिक्षकांकडुन फार अपेक्षा करण्याचे दिवस नाहीत. (काही सन्माननीय अपवाद सोडुन). त्यांचाच सर्वांगीण अभ्यास किती झालाय व महाराज त्यांना किती समजलेत हा एक संशोधनाचा विषय असेल. आपल्या देशात ऐतिहासीक संशोधनासाठी प्रोत्साहन मिळत नाही हे कटू सत्य आहे. डिस्कव्हरी , हिस्ट्री, नॅशनल जिओग्राफी सारखे एकही चॅनल आपल्या देशात नाही ही वस्तुस्थिती आहे.
महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहचवायची जबाबदारी पालकांची आहे. ती त्यांनीच पार पाडली पाहिजे. आईबाप आपल्या सुप्त इच्छा मुलांकडुन पूर्ण करायाला बघत असतात. त्यापेक्षा शिवाजी, शाहू यांचा इतिहास प्रामाणिकपणे मुलांना सांगितला तर खरोखर पुढच्या पिढीवर उपकार होतील व त्यांना प्रेरणा मिळेल. पु.ल.देशपांडे म्हणायचे "पुण्यात एखादी मुलगी सायकलवरुन कॉलेजला जात असली तर मी तिला विचारतो, तुझ्या शिक्षणासाठी कुणी दगड व शेणाचा मारा झेलला आहे ते माहित आहे का ?" तर अशा ऐतिहासिक महान स्त्री पुरुषांची महती पालकांनीच मुलांना सांगितली पाहिजे.
आजच्या दिवसात महाराजांचे कार्य व विचार यांचा प्रसार करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. जाती व धर्मांचे ध्रुविकरण होत असताना महाराजांनी सर्व जातींना जवळ केलेच पण कोणत्यीही धर्माविरुद्ध युद्ध पुकारले नाही हे ठासून बिंबवले पाहिजे. त्यांचे युद्ध अदिलशहा, निजाम, मुघल, सिद्दी, इंग्रज यांच्याशी होते तसेच मराठा सरदारांशीही होते. त्यांचे वैर इस्लाम वा इसाही धर्माशी होते असे औरंगजेब आणि ब्रिटीश पण म्हणू शकत नव्हते.
******
No comments:
Post a Comment