Friday, June 28, 2019

दोन याचिका

By : Vijay Rawoot
पंचाऐशी वर्षापुर्वी भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोर तुरुंगात फासावर चढवले गेले. त्यावेळी भगतसिंगांचे वय होते फक्त 23 वर्षांचे. संपुर्ण आयुष्य समोर पडले असताना तसेच घरचे लोक, मित्र मंडळी सांगत असताना देखील त्यांनी ब्रिटिशांकडे गुडघे टेकले नाहीत. उलट त्यांनी शेवटची याचिका दाखल केली तीच इंग्रजांचे डोके सुन्न करणारी होती. त्या याचिकेत लिहिले होते , "जर मी सरकारशी युध्द पुकारले आहे या माझ्यावरील आरोपांवर आपण ठाम असाल तर मला फासावर न चढवता युध्दातील नियमांप्रमाणे फायरींग स्कॉडकडून गोळ्या घालून ठार मारावे."

पण त्याच बरोबर त्यांनी आपल्या देशबांधवांचे शोषण ब्रिटीश व मुठभर भारतीय बांडगुळे कशा प्रकारे करत आहेत तसेच आपल्या देशासमोर कशाप्रकारचे ध्येय असले पाहिजे याचासुध्दा मुद्देसुदपणे उल्लेख केला होता. भगतसिंग त्यात म्हणाले होते,  "होय ! हे युद्ध अस्तित्वात आहे आणि जोपर्यंत हे शोषण थांबत नाही तोवर हे सुरूच राहील."

"जरी आपले सरकार आमच्यातील मुठभर उच्चभ्रू श्रीमंतांना आमिष दाखवुन व सवलती देऊन मुख्य लढा कमकुवत करेल...जरी स्वातंत्र्याची चळवळ व रिव्होल्युशनरी पार्टी लढ्यात एकाकी पडेल....जरी निराधार झालेल्या महिला कार्यकर्त्यांचा, त्यांच्या पतीच्या, भावाच्या बलिदानाचा विसर शांती प्रक्रियेदरम्यान होईल ....जरी तुमचे दलाल खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्या स्वच्छ चारित्र्यावर शिंतोडे उडवुन त्यांची व पक्षाची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करतील....
तरीदेखील हा लढा सुरुच राहिल...."

सद्या हिंदुत्व, राष्ट्रीयत्व व देशभक्ती यावर रान उठवले जात असताना हिंदुत्व संकल्पनेचे मुख्य प्रवर्तक विनायक सावरकरांच्या याचिकेवर नक्कीच नजर टाकावी लागेल. आणि हे करत असताना हिंद व हिंदुत्व यामधील फरक देखील जाणवेल.

सावरकरांच्या क्रांतिकारक हालचालींना सरकारने पन्नास वर्षांची शिक्षा सुनावून त्यांना आंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवले होते. पण पहिल्या महिन्यापासुनच त्यांनी पत्राद्वारे ब्रिटीश सरकारची विनवणी सुरू केली होती. 1911  ला अटक व 1924 ला सुटका होईपर्यंत असंख्य पत्रांमध्ये त्यांचा सूर एकच होता. "मला मुक्त करा, मी स्वातंत्र लढ्यात कधीच भाग घेणार नाही आणि ब्रिटीश राजवटीशी एकनीष्ठ राहीन." त्यांचे हिंदुत्ववादी भक्त त्यांची ती एक चाल होते हे कितीही म्हणत असले तरी, सावरकर नंतर ब्रिटीश सरकारशी प्रामाणिक तर राहिलेच पण इंग्रजांच्या डिव्हाइड अँड रुलला सोयीस्कर अशी हिंदुत्व संकल्पना पुढे रेटली जी मुस्लीम लीगला पुरक होती.

त्यांचे माफीनामे 'स्ट्रैटेजीक' होते या मताला छेद देणारे उतारे सावरकरांच्याच पत्रांमधेच दिसुन येतात. त्यांनी सुरवातीसच लिहीले होते की, " मी व माझ्यासारखे इतर कैदी येथे आणले गेले पण फक्त मला 'डी' म्हणजे डेंजरस या वर्गवारीमधे ठेवण्यात आले. सहा महिने एकांतवासाची शिक्षा तसेच काथ्या तयार करण्यासारख्या कामाने माझ्या हातातुन रक्तस्त्राव होत आहे. मला यावेळी तेल काढण्याच्या शिक्षेला देखील जुंपले गेले. सहा महिन्यानंतर इतर सर्वांना बाहेर फिरवुन आणले पण मला मात्र माझे वर्तन चांगले असुनही बाहेर नेले नाही. मला जेवण देखील चांगले मिळत नाही."  नंतर त्यांना दोन तीनदा बाहेर नेल्यावर देखील तक्रार करु लागले, " इतर कैद्यांना डझनभरवेळा बाहेर नेले आगे मला फक्त दोनदाच. मी जर या तुरुंगात राहिलो तर माझी जगण्याची इच्छाच मरुन जाईल. मला कमीतकमी देशातील तुरुंगात हलवा. इतर कैद्यांप्रमाणे मला माझ्या नातेवाईकांना तरी भेटता येईल. मला तेवढच बरं वाटेल."

इतकेच नव्हे तर त्यांनी पुढे विनवणी केली की, "जर मला सोडुन दिले तर सरकारशी एकनीष्ठच राहीन. त्यामधेच देशाचं भलं आहे. मला जर मुक्त केले तर बाहेरील जनता पण आपल्या ब्रिटीश सरकारचा जयजयकार करेल. मी देखील सर्व युवकांना लढ्यापासुन परावृत्त करुन मुख्य प्रवाहात आणू शकेन. सर्वशक्तिमानच दयावान असू शकतो. म्हणुन हा पुत्र मायबाप सरकारचा दरवाजा ठोठावण्या शिवाय कुठे जाणार ?" जर ही चाल होती तर दरवेळी सावरकर स्वत:च्या व इतर कैद्यांच्या शिक्षेची व सवलतींची तुलना  वेळोवेळी  का करत होते ? उलट या युक्तिवादामुळे सरकार इतर कैद्यांची शिक्षा देखील कडक करण्याचा धोका होता. 

या दोन्ही Petitions बारकाईने अभ्यासल्या तर हिंद व हिंदुत्व या मधील फरक  समजुन यायला वेळ लागणार नाही. तसेच सावरकरांच्या माफिनाम्याला अनुसरुन  सध्याच्या शूरवीर भक्तांच्या राष्ट्रप्रेमाचा व हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व या संकल्पनेचा जरी अभ्यास केला तर संकटकाळी आजच्या या सरड्यांची धाव देखील कुंपणापर्यंतच असणार याचा नक्कीच अंदाज येईल. 

********
............................................................................

Ref :
Translation by
Shahid Bhagat Singh 
Research Committee
shahidbhagatsingh.org

R C Mujumdar Penal Settlements 
in Andamans Publication Division 
1975








No comments:

Post a Comment